Pioneer P3524 Maize खरीप-रब्बी हंगाम मका लागवड उत्पादन 50 ते 55 क्विंटल एकरी, अशी करा लागवड ?
शेतकरी मंडळी सध्या खरीप हंगाम सुरू होत आहे, आणि आपण बियाणे खरेदी करण्यास सुरू केलेले आहे मात्र योग्य उत्पादन देणारे बियाणे कशी निवड करावी त्यासाठी कोणत्या गोष्टीचे काळजी घ्यावी लागते याची माहिती आपण या लेख मध्ये जाणून घेणार आहेत. Pioneer P3524 Maize
Table of Contents
पायोनियर कंपनीची P3524 संकरित मक्का या वाणाचे लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळवून देणारे एकमेव हे वाण. इतर वाणाच्या तुलनेत या वाण्याची उगम क्षमता अतिशय चांगली आहे मात्र यामध्ये विशेष प्रत्येक झाडाला दोन कणीस लागतात.
या वाणाचे लागवड खरीप व रब्बी हंगामामध्ये केली जाते जर आपण खरीप हंगामामध्ये मक्का वाहनाची लागवड करण्याचा विचार करत असेल तर या पायोनियर कंपनीचे P3524 एकदा नक्की लागवड करा.
लागवड करण्यासाठी जमीन व माती कशी पाहिजे ?
Pioneer P3524 Maize विविध प्रकारच्या माध्यमातून जमिनीमध्ये हे पीक घेतले जातात आणि उत्तम विचारांची जमीन तसेच मध्यम ते भारी जमीन या पिकाकरता अतिशय उपयुक्त आहे. जमिनीचा सामू 5.5 ते 7.5 मध्ये असावा.
15 सेमी खोलीपर्यंत एक ते दोन वेळा नांगरणी करून दोन वेळा वखरणी करावे.
जमिनीमध्ये शेवटच्या वखरणीच्या अगोदर चांगले कुजलेले खत शेणखत 5 ते 8 किंवा 10 ते 15 बैलगाड्या टाकाव्यात प्रति एकर साठी
बियाण्याचे प्रकार
7 ते 8 किलो प्रति एकर साठी बियाणे वापरावे.
बीज प्रक्रिया – या बियाण्यासाठी थायरमची बीज प्रक्रिया केलेली आहे तसेच तुम्ही मार्केटमधून गावच्या याचा वापर करू शकता.
पेरणीची वेळ – खरीप मध्ये पेरणी करण्याची वेळ 15 मे ते 15 जुलै पर्यंत व रब्बी मध्ये 15 ऑक्टोंबर ते 30 नोव्हेंबर
पेरणीची पद्धत
बियाणे हे टोचून केव्हा यंत्राद्वारे एका ओळीत लावावे.
चांगल्या उत्पादनासाठी एकरी 30000 हजार ते 32000 रूपाची लागवड करावी आणि दोन ओळीतील अंतरानुसार दोन झाडांतील अंतर खालील प्रमाणे ठेवावे. Pioneer P3524 Maize
दोन ओळीतील अंतर (सेमी/इंच) | दोन झाडातील अंतर (सेमी/इंच) |
60 सेमी / 24 इंच | 22 सेमी / 8 इंच |
55 सेमी / 22 इंच | 25 सेमी / 10 इंच |
50 सेमी / 20 इंच | 27 सेमी / 11 इंच |
तन व्यवस्थापन कसे करावे
- चांगल्या उत्पादनासाठी मका हे पीक सुरुवातीचे 30 ते 40 दिवसापर्यंत तन विरहित ठेवावे.
- मका पिकातील तणाच्या प्रभावीपणाने नियंत्रणासाठी ॲट्रॉसिंग एक किलो + अर्धा किलो ची फवारणी पेरणीच्या 24 ते 48 तासाच्या आत करावी.( उगवणे पूर्व)
- तन नियंत्रणासाठी मका पीक 25 ते 30 दिवसाचे झाल्यावर किंवा तन तीन ते पाच चार पाण्याचे असताना BASF चे Tenzer याची फवारणी करावी फवारणी करताना दुकानदाराचा सल्ला घ्यावा.
महत्त्वाची गोष्ट – तणनाशकाच्या फवारणीच्या वेळी जमिनीमध्ये ओलावा असणे गरजेचे आहे ओलावा नसला तर तन हे नष्ट होत नाही.
खत व्यवस्थापन कसे करावे
संतुलित खतासाठी 75 किलो युरिया, 50 किलो डीएपी आणि 40 किलो एमओपी ची प्रति एकर शिफारस केलेली आहे.
खताची मात्रा ही खालील प्रमाणे विभागून द्यावी. Pioneer P3524 Maize
वेळ | युरिया (किलो/एकर) | डीएपी (किलो/एकर) | एमओपी (किलो/एकर) | झिंक (किलो/एकर) |
पेरते वेळेस | 35 | 50 | 25 | 10 |
गुडघ्याच्या अवस्थेत | 20 | — | — | — |
फुलोरा अवस्थेत | 20 | — | 15 | — |
एकूण | 75 | 50 | 40 | 10 |
पाणी व्यवस्थापन
- जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीत योग्य ओलावा राहण्यासाठी पाणी द्यावे.
- पाणी देण्याच्या मुख्य अवस्था खालील प्रमाणे आहे.
- उगवण झाल्यावर, गुडघ्यापर्यंतची उंची असताना, परागीकरणाची अवस्थांना, दाणे भरण्याची अवस्था
- मुख्यत्वे करून चांगल्या उत्पादन प्राप्तीसाठी परागीकरणापासून दाणे भरेपर्यंत जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे.
कीटक नियंत्रण Pioneer P3524 Maize
मक्का पिकाला सुरुवातीला खोडकिडी व अमेरिकन लष्करी अळीपासून बचाव करण्यासाठी योग्य कीड नियंत्रणाची आवश्यकता असते जेणेकरून झाडाची व उत्पन्नाचे गट थांबविण्यात मदत होते सुरुवातीला येणाऱ्या किडीपासून प्रभावीपणे नियंत्रणासाठी पायोनियर लुमिझन ब्रँड बियाण्याची लागवड करावी. Pioneer P3524 Maize
खोडकिडा प्रभावी नियंत्रणासाठी डेलिगेट याची 15 लिटर पंपासाठी 15 एम एल वापर करावा.
किंवा शंभर मिली डेलिगेट प्रति एकर लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी फवारावे व तसेच लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी पुन्हा डेलिगेटची फवारणी घ्यावी जेणेकरून अमेरिकन लष्करी अळीचा प्रभावीपणाने नियंत्रणासाठी वांग्याच्या आत फवारणी करणे आवश्यक आहे.
पायोनियर P3524 महत्त्वाची वैशिष्ट्ये
- P3524 या वाणाची कणसे मोठी व एक समान आकाराची असतात.
- P3524 या वानात जास्त ओळी जास्त दाणे जास्त शेलिंग आहे.
- P3524 या वाहनाची कणसे टोकापर्यंत भरतात.
- P3524 या वानात उभे राहण्याची उत्कृष्ट क्षमता आहे.
महत्त्वाची सूचना- वर दिलेली माहिती कंपनीच्या अंतर्गत चाचण्यावर आणि शेतातील प्रयोगातील चाचण्यावर आधारित आहे परंतु हवामान परिस्थिती हंगाम मातीचा प्रकार पीक व्यवस्थापन पद्धतीचा परिणाम उत्पादनावर होतो व तो आपल्या नियंत्रणाखाली नाही तर उत्पन्नाची संपूर्ण जबाबदारी शेतकऱ्यावर असेल जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेवर पेरणी करावी व योग्य व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा ही नम्र विनंती.
Pioneer P3524 Maize शेतकरी मंडळी जर ही माहिती आपल्या कामाची किंवा तुम्हाला यामधून काही महत्त्वाची गोष्ट आवडली असेल तर आपल्या जवळील शेतकऱ्यांना ही माहिती नक्की कळवा व इतर सोशल मीडियावर किंवा व्हाट्सअप ग्रुप वरती ही माहिती शेअर करा.